मनोगत दिवाळी अंकासाठी पाककृतीही मागवण्यात येत आहेत.
पाककृतींसाठी सूचना:
१. मनोगतावर पाककृती लिहायला जो साचा वापरला जातो तशाच साच्यात पाककृती लिहून पाठवाव्या. उदा. पदार्थाचे नाव, वाढणी अमूक जणासाठी अंदाजे, लागणारा वेळ अंदाजे,साहित्य क्रमवार, मार्गदर्शन क्रमवार व विशेष काही टिप असल्यास ती अशाप्रकारे लिहून पाठवल्यास उत्तम.
२. दिवाळी अंकाची शोभा वाढवण्यासाठी तुमच्या पाककृतीबरोबर पाककृतीचे छायाचित्रही असावे अशी अपेक्षा आहे.
३. दिवाळी विशेष व मनोगतावर पूर्वी न आलेल्या पाककृती पाठवाव्यात. गोड/तिखट कोणत्याही.
पाककृती स्तंभात नियमीत पाककृती लिहीणाऱ्या सर्व गृहीणी व पुरुष मनोगती सदस्यांकडून प्रतिसादाची अपेक्षा आहे.