कळप हुंदडे पुष्ट ढगांचा
          मत्त हत्तीसम पिऊन वारा
वेदघोष पर्जन्यऋचांचा
          करत चालल्या या जलधारा

क्या बात है! योग्य आणि पूरक शब्दांची पखरण आहे !

नभमंची कल्लोळ माजवी
           वीज नाचते सोडून लाज
धुंद होऊनी वरूण वाजवी
           अनाहताचा जणु पखवाज

मस्त मस्त! डोळ्यासमोर वीज की/आणि नर्तिका असे चित्र उभे राहिले!

कोठे प्राशीत लाल वारुणी
           नदी भटकते झिंगून जात

उत्तम वर्णन केले आहे. अलंकार छान आले आहेत.

कविता उत्तम आहे!!!!!