वेळच्या वेळी कचरा उचललला, कचऱ्याच्या पेट्या साफ ठेवल्या तर सफाईकामगारांना अश्या वाईट परिस्थितीत काम करावे लागणार नाही अश्या अर्थाचा एक लेख शाळेत असताना (!) एका दिवाळी अंकात वाचल्याचे आठवते. मुळात कचरा सडेपर्यंत थांबून मग तो साफ केला तर कामगारांना कितीही चांगले मोजे दिले तर अपाय करणारच. त्यासाठी तो वेळच्या वेळी साफ करणेच गरजेचे आहे. माहितीच्या अधिकाराचा इथे अगदी व्यवस्थित वापर करता येईल असे वाटते. आपापल्या शहरांसाठी आपण पुढाकार घ्यायला हवा.