कल्पना फारच आवडली. हर्शीजची किसेस हॅलोवीन काळात इतकी आलेली किंवा आणलेली असतात की त्यांचा कंटाळा येतो, हे करून पाहायलाच हवे. आमच्या घरात अशा पाककृतींसाठी (म्हणजे थंड - आइसक्रिम इ.) बाजारातल्या चेरीच सर्वांना आवडतात. त्याच वापरून करून पाहते.

अवांतर: मायक्रोवेव ओवन म्हणजे सूक्ष्मलहरीभट्टी असे हवे का? सूक्ष्मभट्टी म्हटल्याने मायक्रो-ओवन असा योग्य अर्थ दिसत नाही. या ओवनमध्ये जास्त महत्त्व लहरींनाच असते असे वाटते.