आपण लिहीलेल्या पहील्या दोन वाक्यातच आजची समाजवृत्ती प्रकट होते आहे. १०वी चे शिक्षण हा पदवी साठीचा पाया असून बरेचसे उपयुक्त आहे. १०वीच्या बळावर रोजगाराची अपेक्शा करणे हेच मुळात चुकीचे आहे. साधारणत: १० वी तील विद्यार्थाचे वय १५-१६ दरम्यान असते या वयात रोजगार मिळवण्याची अपेक्शा करावी का?
पदवी शिक्षण मात्र रोजगाराशी संबधित असल्याने त्यावर पालकांनी दिशा दाखवण्यास काहीच हरकत नाही. त्या विद्यार्थाला कुठले शिक्षण झेपेल याचा अंदाज पालकांना असु शकतो व त्याचा उपयोग पुढील वेळ वाचवण्यासाठी होउ शकतो.
रोजगाराचा विचार डोळ्यासमोर ठेवून शिक्षण देण्याची कल्पना रूढ होण्यामागे मुख्य कारण मुलांनी लवकर स्वावलंबी ही अपेक्शा बाळगली जाते आहे म्हणूनच ! ह्यात चुकीचे ते काय ?
विनम्र