http://www.manogat.com/node/10773
ही कविता वाचा. मलातरी वाचून काहीच कळले नाही. छंद बिंद पण तडजोड करु हो, पण अर्थ तरी किमान कळायला हवा की नको?की एकापुढे एक चिठ्ठी टाकून निवडून मांडलेल्या शब्दांना कविता म्हणायचं?
अवांतर : मनोगताबाहेर तशीच आणखी चीड आणणारी बाब म्हणजे 'ती मराठी मुलगी असते' ही विरोपांतून फिरणारी कविता, 'तू पेढा मी बर्फी, तू ओनिडा मी मर्फी' अशा भयंकर कविता. एखाद्या मुलाला त्याच्या हपिसातली जीन्सवर पैंजण घालणारी मराठी मुलगी आवडून तिच्यावर कविता करावीशी वाटत असेल, त्याने करावी, तिला दाखवावी, पण या अशा कविता विरोपातून गावोगाव 'गुड१, मस्ट रीड' म्हणून फॉरवर्ड का होतात?
अवांतर २: लहानपणी मी भयंकर असंबद्ध कविता करायचे (आताही कधीकधी करते!) आणि इतक्या लहान वयात त्या करत असल्याने ऐकणारे (नाईलाजाने) वा वा म्हणायचे. 
त्यावेळच्या दोन कविता(?):
१. एक ढग आला,
दुसरा ढग आला,
सगळेच ढग आले,
पाऊस पाडून गेले

२. आकाशात चमकतो एक तारा
तो आहे _____(इथे मी त्या काळी वारलेल्या एका नेता मायलेकांची नावं टाकली होती)