काही सन्मान्य अपवाद वगळता नवकविता (किंवा ज्याला प्रायोगिक काव्य म्हणता येईल) अशा बऱ्याच कविता दर्जाहीन आहेत असे म्हटले तर वावगे ठरू नये. त्यामुळे एकूणच अशा पद्धतीची कविता (चांगली असली तरी) दिसली की ती टाळायची अशी मनोगत वाचकांची मनोवृत्ती झाली आहे.
येथील कविता आणि त्यांना वाचकांचा प्रतिसाद पाहता - वाचकांच्या मनाला त्रास होईल, समजायला अवघड जाईल अशा कवितांकडे दुर्लक्ष कऱण्याकडे कल दिसून येतो. पण कोणताही कलाप्रकार समजावून घेणे हेही वाचकांचे कर्तव्यच आहे. तो तुम्हाला आवडला नाही तरी त्या प्रकाराचे इतरही भोक्ते असू शकतात.
प्रस्तुत चर्चा बांडगुळे आणि तिरडी असे शब्द न वापरताही करण्यासारखी होती.तसेच अमेरिकन आणि भारतीय वाचक अशी वाचकांची भौगोलीकदृष्ट्या नसून मानसिक असावी.
वरील चर्चेस आमचा प्रतिसाद म्हणून मुद्दामच एक कविता लिहिली आहे. आवडली किंवा नाही तरी सकारण प्रतिसाद द्यावा. अकारण "आवडली नाही" / "आवडली" अशी अधांतरी विधाने करू नयेत. कविता समजली नाही तर तसे सांगावे म्हणजे अर्थ देता येईल. या चर्चेचे प्रस्तावक आणि आतापर्यंत प्रतिसाद देणारे वाचक यांचे मत जाणून घेऊ म्हणतो.
आमच्या मते तरी ती कविता दर्जाहीन नाही. तेंव्हा आम्ही आमची तिरडी उचलली जाते की तळी याची वाट पहात आहोत.
आपला,
दस नंबरी
ता.क.
अनुजी, http://www.manogat.com/node/10773 या कवितेचा उल्लेख आपल्या प्रतिसादात करून आपण आमच्यावर अनंत उपकार केले आहेत. निदान आपण ही कविता वाचून तिचा अर्थ काय असावा? किंवा काहीच अर्थ नसावा काय? इतका तरी विचार केलात. धन्यवाद!
आपणाला हवा असलेला अर्थ मी सांगेनच!