मी अष्टावक्रगीतेवर तद्रुपानंदस्वामींची प्रवचने ऐकली होती. पण ती गुजराथी भाषेतून होती. ह्याच विषयावर रजनीशांनीही प्रवचने केली आहेत. पण ती हिंदी आणि इंग्रजी मध्ये.

मराठी भाषेत अजून काही ऐकले किंवा वाचले नाही. त्यावर लिहिण्याइतका माझा अभ्यास नाही; म्हणून धाडस केले नाही. पण जमल्यास कुणी अधिकारी लिहिणार असेल तर मी मदत करेन. अगदीच नाहीतर त्यातील श्लोक आणि त्यांचे भाषांतर तरी लिहिण्याचा विचार आहे.

बाकी उपनिषदांबद्दल काही हवे असेल तर व्य. नि. ने कळवा. जी  आहेत ते वाचायला देऊ शकेन.