माफी असावी साहेब, मी एका प्रतिसादात आपल्या कवितेचा उल्लेख केला. असा व्यक्तीगत उल्लेख करणे खरं तर बरोबर नाही. पण त्यानंतर आता परत वाचून पाहिली तरी काही कळली नाही. एकंदर अमुक ऐवजी तमुक वापरले तर जखमा कमी होतील असा अर्थ ढोबळमानाने असावा असे वाटते.
कविता हा माझा प्रांत नाही, आणि त्यांत मला विशेष कळते असाही माझा दावा नाही. मुखपृष्ठ चाळत असताना विचीत्र नाव वाचून ही कविता वाचली आणि वाचल्यावर चक्रावल्यासारखं झालं.
यात काही गूढ अर्थ असेलही, पण माझ्या अल्पमतीला तरी तो कळला नाही.