सुंदर लेखबद्दल अभिनंदन. आपले मन कुठल्या गोष्टीची कशाबरोबर सांगड घालून ठेवील ते सांगता येणार नाही. पण परीक्षेचे दिवस आणि चाफ्याचा बहर अशी एक जोडी वारंवार येत असेल तर ती लक्षात राहते. कैरी पाहताच कोकिळेचे कुहू कुहू ऐकू आल्यासारखे वाटेल.
तुमच्या प्रश्नाचे उत्तर "नाही" असे आहे. आपण दिलेल्या लेखावर जोपर्यंत एकही प्रतिसाद येत नाही तोवर त्यात सुधारणा करता येते. त्यानंतर ते अधिकार फक्त 'मनोगत' च्या संपादकांकडे असतात. ते हे काम करू शकतात.