भोमेकाका, प्रीती दी, आनंदघन, प्रतिसादाबद्दल मनापासून आभार.

प्रीती दी, मायक्रोवेव्ह ओट्यावर होता. वादळ असल्यामुळे सर्व कचेऱ्या बंद होत्या त्यामुळे नवरा घरी होता. नवरा दूरदर्शन वर हिंदी/मराठी मालिका बघत नसून इंग्रजी विनोदी मालिका व अधुनमधून  हवामानखात्याच्या बातम्या बघत होता. असो.

अहो पण बेडूक स्वयंपाकघरातच असताना मानसीने जेवण कसे केले? हे सांगायचे राहूनच गेले!

श्री अत्यानंद,

दुपारची पोळी भाजी असल्याने मानसीने रात्री फक्त आमटीभातच लावला, तोही घाबरत घाबरत. पोळी भाजी करायची असती तर जरा कठीणच होते, कारण ते पिल्लू कधीही पटकन उडी मारायचे त्यामुळे कणीक भिजवताना त्याची उडी कणकेत पडण्याची भीती होतीच.

रोहिणी