नियतीशी
"एकलम खाजा"
खेळताना वापरले तर
ढोपरी काढताना
कोपर फुटले तरी
अश्रूंचे रक्त ठिबकत नाही!!! 

हे मस्त आहे.

आधीचा विशेषणप्रचुर  भाग तसा आकर्षक, अद्भुत आणि उगाच वाटणारा.  ज्याच्याकडे फारसे काही सांगण्यासारखे उरत नाही त्याला अशा भरमसाठ विशेषणांचा आसरा लागतो.  जे सांगण्यासारखे असते त्याला विशेषणे लागत नाहीत, असे माझे मत आहे. गद्य आणि पद्य दोहोंच्या बाबतीत.

फक्त एका वाक्यात कवी हे सारं सांगतो म्हणून ती कविता. कवीच्या मनात निर्माण झालेल्या प्रतिमा काही लोकांना कळतात, काहींना नाही. पण म्हणून ते काव्य नाही असे कसे म्हणता येईल?

काव्य नाही असे म्हणता येणार नाही. पण असे 'प्रयोगशील' काव्यच मराठी कवितेच्या क्षेत्रात खरी क्रांती आणतं आहे असे केवळ परिसंवादांतून महान झालेल्या कवींचे म्हणणे आहे. ते खरे नाही.  ही खरी क्रांती आहे म्हटल्यावर मग ही क्रांती कुणासाठी हाही सवाल आहे. असो.

आगामी  दुब्बी राजा, तीरान भोजे, चार चौकटी, पंचल पांडव, सय्या झेंडव, सात चौकटे, अष्टक नल्ले,  नऊ नऊ किल्ले, दस्शी गुलाबा, अकल खराटा, बाळू मराठा, तेरलंगी सोटा  आदींना शुभेच्छा!