एका इंग्रजी शब्दाला एकच मराठी प्रतिशब्द हा आग्रह सोडला की भराभर शब्द  सुचतात.  कारकीर्द हा भूतकाळातील करियरसाठीच अधिक योग्य आहे.  'नोकरीचा काळ' सुद्धा उचित.  करियर गायडन्सला व्यवसायमार्गदर्शन.  इथे 'व्यवसाय' योग्य. भावी  ब्राइट करियरसाठी (उज्ज्वल)भविष्यकाळ.  पास्ट करियरसाठी पूर्वायुष्यातली कामगिरी.  असे अनेक पर्याय शक्य आहेत.  संदर्भाप्रमाणे वेगवेगळे शब्द(समूह) अचूक ठरतील, एकाच प्रतिशब्द धरून बसलो की मतभेदाचे फाटे फुटतात.