व्यावसायीक कवींच्या वाईट रचना असतात पण चांगल्याही असतातच की. मग तुम्ही फक्त वाईट कविता वेगळ्या कशा काढणार? आणि आधी म्हटल्याप्रमाणे मला न आवडलेली कविता तुम्हाला आवडून जाईल आणि तुम्हाला न आवडलेली कविता मला आवडून जाईल. जसे "एकलम खाजा". कवीने स्पष्टीकरण दिल्यावर ती कविता मला आवडली. तुम्हाला नाही आवडली. आता बरोबर कोण आणि चूक कोण? मुळात रसग्रहण हे बरोबर किंवा चूक असतच नाही वैश्विकरित्या. ते व्यक्तिगत चांगले किंवा वाईट असू शकेल मात्र. ह्यावर उपाय मला तरी सुचत नाही.