"आपण वरकरणी ज्या मनाचा विचार करतो तो फक्त बाह्य मनाचाच. आपल्याला आणखीही एक मन पाठीमागे कुठे तरी (back of our mind) आहे, त्यातही काहींतरी सतत घडत असतं आणि त्याचा परिणाम आपल्या बाह्य मनावर होतच असतो हे कधी आपण ध्यानात घेत नाही. आणि त्याही पेक्षा महत्वाची गोष्ट ही की बर्याचदा आंतर्मनात आपण कशाची तरी, कांही तरी घडाण्याची वाट पाहात असतो. ज्याची वाट आपण पाहात असतो ते व्यावहारिक जगाशी बहुदा सुसंगत नसतं. त्यामुळे बाह्य मन ते सतत नाकारत असतं. मात्र त्या वाटण्याला सभोवतालच्या परिस्थितीचं परिमाण असतं; सभोवतालच्या परिस्थितीमुळे झालेला तो एक परिणाम असतो."
विचारप्रवर्तक लेखन.