ही अशी इदीसारखी विलक्षण माणसे नेहेमीच आपल्या अवतीभोवती असतात, फक्त त्यांना ऐकण्याची आपली तयारी पाहिजे, त्यांच्या व्यथा अथवा त्यांचे आनंद समजण्याएव्हढी संवेदना आपल्यापाशी पाहिजे. अरुणांपाशी तशी ती आहे, व ही अनुभवमाला त्याचे वारंवार प्रत्यंतर देते.