एकतर डोसे ज्या पाश्वभूमीवर आपल्याला दिले गेले असे आपणाला जाणवले, त्याचा तुम्ही उल्लेख केला आहेच व तो ठीकही आहे. पण त्यानंतर त्या डोश्यांच्या गुणवत्तेवर टिकाटिप्पणी करणे मलातरी खटकले. काही का असेना, कुणीतरी त्यांच्या घरी, ते स्वतः खाणार तसेच डोसे आपणाला करून घातले होते ना? शिवाय परदेशात राहताना जी काही साधनसामग्री उपलब्ध आहे, त्यातच भागवावे लागते. आणीही काही कारणे असू शकतात.
दुसरे म्हणजे आपल्याला आलेला अनुभव, ज्यात थोड्या जुजबी ओळखीनंतर माणसे लगेच पगार वगैरेंची चौकशी करू लागतात. खरे तर इतक्या वर्षांनंतर आत हे खटकेनासे झाले आहे. एका दुसऱ्या संकेतस्थळावर भारतीय माणसे परदेशात एकमेकांना फटकून का राहतात, अशी चर्चा नुकतीच वाचनात आली. त्यातील अनेक बऱ्यावाईट कारणांमधील हे एक प्रमुख कारण होय. माझा अनुभव असा की नुकतीच नवी आलेली व अगदी जुजबी ओळख असलेली माणसेच असे विचारतात असे नाही. अगदी विमानप्रवासात जरी एखादा सर्वस्वी अनोळखी भारतीय शेजारी बसला असला तर तो हमखास 'पगार काय', 'घराचे भाडे काय' असल्या चौकश्या ओळख होताहोताच करू लागतो.