>>तसेच फक्त मुक्तछंदातील ते काव्य व छंदबद्ध ती निव्वळ शाब्दिक कसरत ही भूमिकाही पटण्यासारखी नाही. <<
माझी भूमिका अशीच आहे हे तुम्ही कुठल्या आधारावर ठरवलंत? असं मी तरी कधीही कुठेही म्हणाले नाहीये.
कविता किंवा कुठलाही कलाप्रकार हा व्याख्येत बसवता येत नाही. ती व्याख्या सतत वाढत वा बदलत असते.
दर्जा सापेक्ष असतो असे मी तरी म्हणाले नाहीये. दर्जाचे निकष ठरवायचा मी माझ्या परीने प्रयत्न सुरू केला होता. अनेक निकषांपैकी एक मांडला होता आणि सर्वांनी त्यात भर घालत जावी असंही म्हणाले होते पण नंतरचे २-३ प्रतिसाद मुक्तछंद म्हणजे वाईट आणि छंदोबद्ध तेच काय ते उत्तम असेच दिसले. बाकी काही नाही.