अत्यंत उत्तम आणि मार्मिक विवेचन वाचावयास मिळाले.
'द्वारकेचा राणा' हा शब्दप्रयोग केवळ द्वारका या राज्याचा प्रमुख या अर्थी नसावा. आपले शरीर हे नऊ द्वारांनी वेढलेले आहे. या द्वारावतीचा राणा जो प्रत्यक्ष परमेश्वर या दृष्टीने देखील हा प्रयोग असावासे वाटते. इतर कोणाहीपेक्षा अर्जुन श्रीकृष्णाच्या जास्त जवळ होता. प्रभुचे नामास्मरणात तो अगदी निमग्न असे. तेव्हा श्रीकृष्ण अशा भक्ताच्या जवळ सापडावा यात नवल ते काय?