मला जे सांगायचं आहे, ते कथेतून सांगितलं आहे.
तुम्ही उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरं आहेत कथेत. पण तो विचार ज्याचा त्यानं करावा, आणि स्वत:ची उत्तरं शोधावीत हे अपेक्षित आहे.
'माझी' उत्तरं अशी आहेतः
श्रेयस आणि प्रेयस यांमध्ये प्रेयस निवडणे नेहमीच शक्य नसते. तो निर्णय शेवटी प्रत्येकाने स्व:तकरता घ्यायचा असतो. प्रेमात न पडणे शक्य नाही, पण वाहवत जायचं की प्रेमाला निखळ मैत्रीचे स्वरूप द्यायचं, सगळं मोडायचं की बायकोची काही चूक नाही हे जाणून तिला आपल्या प्रेमाची झळ लागू द्यायची नाही, आणि जर भावना इतक्या तीव्र असतील तर बायकोला 'फेस' करण्याची हिंमत करायची का, की आजचं उद्यावर ढकलत रहायचं...आपली सोय पहायची.... हे आणि अजून कितीतरी पर्याय अस्तित्वात असतात.
आणि अनेक पर्याय 'सायली'लाही उपलब्ध असतात. माझा अद्वैत काय निवडतो आणि सायली त्याला काय सांगते, ती स्वत: काय निवडते हे सगळे पाहिलेत तर मला काय म्हणायचे आहे ते स्पष्ट होईल, असे मला वाटते.