दि. १५ जुलै रोजी एक गद्य लिखाण पोहचले आहे. धन्यवाद.
प्रेषकांनी संपादक मंडळास 'ते स्वीकारले की नाकारले' हा निर्णय लवकर कळवायला सांगितला आहे, पण येणाऱ्या साहित्याची संख्या अजून काही लिखाणांनी वाढल्याशिवाय असे पटकन सांगता येणे कठीण आहे.
चांगल्या साहित्याला न्याय देण्याचा प्रयत्न नेहमीच राहील. तरी सर्वांना ही विनंती की 'आपले लिखाण ठीक आहे का, स्वीकारतील का' इ. विचार सध्या बाजूला ठेवून आपल्या प्रतिभेला लिखाणात पूर्ण मन व एकाग्रता घालू द्यावी. हळूहळू दिवाळी अंकाबद्दलचे चित्र अधिक स्पष्ट होत जाईलच.

कृपाभिलाषी,
संपादक मंडळ.