निनाद,

छान! थोडक्यात किती छान लिहिले तुम्ही. 'लंपन', 'सुमी', 'कणबर्गी गंग्या' ही पात्र 'मॅड की काय म्हणतात ते...' करणारीच आहेत. आपण घेतलेला अनुभव मीसुद्धा घेतला, 'स्पर्श' मध्ये.

'लहान मुलाच्या गोष्टी असूनही फक्त लहानांसाठीच नसणारे' हे या पुस्तकाचं वैशिष्ट्य आहे. इतकी दर्जेदार आणि सदैव आठवणीत राहतील अशी पात्र असणारी पुस्तकं लिहिणाऱ्यांचे शतशः आभार मानायला हवेत.

निनाद आपण फार छान विषय सुरू केलात.

संतांविषयीचे काही अनुभव कुणाला असतील तर ते लिहा! संतांना हे सुचले कसे? त्यांना जाणून घ्यायची फार फार इच्छा आहे.