पुणेकरांबद्दल आता इतके विनोद झाले आहेत की ते कटाक्षाने सुधारले असावेत. अर्थात 'सर्व सरदारजी बिनडोक असतात' या अतिशयोक्ती व सर्वसामान्यीकरण(जनरलायझेशन) तत्त्वावर बरेच सरदारजी विनोद असतात तसेच हे पुणेकरांच्या गोष्टी.सर्वच तसे नसले तरी त्यात थोडे तथ्य असावे असे वाटते.
डोशाबद्दलची टिका विशेष रुचली नाही. शिवाय जाळीदार डोसा वाईट कसा हेही पटले नाही.(उत्तप्पा असतो ना जाळीदार?)
कोणालाही पहिल्या भेटीत पगार विचारणे हा अत्यंत भोचकपणा. पण घरभाडे विचारण्यात मला काही गैर वाटत नाही. अमक्या ठिकाणी आपण राहतो, राहायला अजाणार आहोत पण त्या ठिकाणच्या तुलनेत इतर घरभाडी कमी आहेत का जास्त , किंवा इतर कुठे अजून चांगले घर मिळू शकेल का यासाठी बऱ्याच जणांना तसे विचारण्याचा मोह होतोच.
(५ वर्षापासून पुणेकर)अनु