लिखाणात कुठलाही शब्द वापरताना तो अपरिहार्य आहे की नाही हे बघावे. तसेच शक्य आहे तिथे विशेषणांऐवजी क्रियापदे वापरावीत. कारण विशेषणे ओढूनताणून आणलेली आणि कृत्रिम वाटू शकतात. म्हणूनच झुळूक आल्हाददायक होती  असे म्हणण्यापेक्षा झुळूक सुखावून गेली असे म्हणावे.  सहसा मोठे शब्द (४ सिलबल/अक्षरांपेक्षा जास्त लांबी असलेले) वापरू नयेत, असे थोरामोठ्यांचे म्हणणे असते.
तुम्ही दिलेली उदाहरणे आपल्या जागी योग्य आहेत.पण कवितेत वरील कवितेतील काही अस्थिपंजरादि विशेषणे मला तरी अनावश्यक, ओढून ताणून आणलेली वाटतात. अर्थात ही माझे मते आहेत.  संवादासाठी एकमत होणे गरजेचे नाही.  तुम्ही म्हणता तसे प्रयोगशील काव्याचे स्वागत व्हायला हवे. किंबहुना कुठल्याही चांगल्या काव्याचे स्वागत व्हायलाच हवे.
पण या मूठभर 'परिसंवादांतून महान झालेल्या ' कवीच्या म्हणण्यास विरोध म्हणून समस्त प्रयोगशील कविता ही दर्जाहीन आहे असा निष्कर्ष काढणे दुर्दैवाचे ठरेल.
सहमत. असा निष्कर्ष मी तरी अजून काढलेला नाही. गैरसमज नसावा.