...पण घरभाडे विचारण्यात मला काही गैर वाटत नाही. अमक्या ठिकाणी आपण राहतो, राहायला अजाणार आहोत पण त्या ठिकाणच्या तुलनेत इतर घरभाडी कमी आहेत का जास्त , किंवा इतर कुठे अजून चांगले घर मिळू शकेल का यासाठी बऱ्याच जणांना तसे विचारण्याचा मोह होतोच.
कबूल. पण मला वाटते आपला हा उल्लेख माझ्या ह्या टिप्पणीच्या संदर्भात होता:
माझा अनुभव असा की नुकतीच नवी आलेली व अगदी जुजबी ओळख असलेली माणसेच असे विचारतात असे नाही. अगदी विमानप्रवासात जरी एखादा सर्वस्वी अनोळखी भारतीय शेजारी बसला असला तर तो हमखास 'पगार काय', 'घराचे भाडे काय' असल्या चौकश्या ओळख होताहोताच करू लागतो.
थोडीफार ओळख झाल्यावर, जेव्हा समोरची व्यक्ति व आपण सर्वसाधारणपणे समान वर्गातले आहोत, म्हणजे आपली क्रयशक्ति समान आहे, हे लक्षात आल्यावर अशी माहिती देणे व घेणे हे साहजिकच आहे, त्याला माझा आक्षेप नाही. पण माझा रोख अगदी जुजबी ओळख असलेल्या व्यक्तिंवर तसेच प्रवासात कुणीतरी अनोळखी भारतीय सहप्रवासी असे विचारतात त्यांच्यावर आहे. ह्या दुसऱ्या वर्गातले लोक बरेचदा भारतातच रहाणारे असतात, व कुतूहुल म्हणून ते हे प्रश्न विचारत असतात. खरे तर अशा कुण्या एखाद्या 'क्ष' देशात रहाणाऱ्याला इतका पगार मिळतो व त्याचे घरभाडे अमूकतमूक आहे, ह्या माहितीने त्याच्या सर्वज्ञानात काहीही भर पडत नाही. पण जाता जाता उगाचच, आपण म्हणता तसे, भोचकपणे हे विचारले जाते.