कोरडे साहेब,

जागतिक हिंदीदिवसाच्या पार्श्वभूमीवर मी या कथा वाचत होतो. कदाचित कोठेतरी याचा उल्लेख येईल असा सुप्त अंदाज मनात होता. प्रकट दिवसाची माहिती नसतानाही आपण जी कथा लिहिली त्याबद्दल आपले अभिनंदन करावेसे वाटते.

विनोबाजी भूदान यात्रेत फिरत असताना एकदा तुलसीदासांची पुण्यतिथीच विसरून गेले. तोपर्यंत त्यांचा असा प्रघात होता की तुलसीदासाच्या पुण्यतिथीला सुंदर रामायण वाचायचे. त्या रात्री झोपेत त्यांना असा भास झाला की कोणी तरी वृद्ध त्यांच्या डोक्याजवळ बसलेला आहे. या मागच्या नेमक्या रहस्याचा उलगडा नंतर झाला.

तुमच्या तद्रूपतेमुळेच ५५ वर्षापूर्वीची गोष्ट तुम्हाला योग्यवेळी आठवली असावी असे मला वाटते.

ज्या भाषेत अश्या सुंदर कथा आहे ती चिरंजीव होवो!!!

द्वारकानाथ