अंजलीताईना मनोगताविषयी जी कळकळ वाटते त्याचा मला अतिशय आदर आहे. त्यांनी सांगितलेले उपाय योग्य असले तरी सभासदांना गुण देण्याचा अधिकार दिल्यास पुन्हा लेखांसमोर विविध गुणांचा ढीग तयार होईल वा त्याचा मध्य घेतला तरी  त्यातून हवी ती रचना शोधली तरी आवडेलच याची खात्री नाही..तेव्हा हेच गुणवत्ताप्रदानाचे काम प्रशासकीय अधिकार असलेल्यांनी केले तर अधिक सुलभ होईल. त्यामुळे वर प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे हे अधिकार कोणाकोणास आहेत, लेखन कसे असावे/ असू नये याचे सदरानुसार नियम आहेत का कोणते आहेत, ते कसे पाळले जातील याचे विश्लेषण जर आधीच केले तर आपण म्हणता तसा आपला व इतर मनोगतींचा बहुमूल्य वेळ जाणार नाही व मनोगताचा दर्जा सुध्दा खालवणार नाही. अर्थात आता लेखक/ कवी मंडळीना त्याच्या रचनांना हे असे निकष लावलेले चालणार आहेत का? ही काही परीक्षा नाही. मला एवढेच गुण का आणि त्याला जास्त का अशा तक्रारीपण कुणाकडे न्यायच्या ते सुद्धा प्रशासकांनी सांगा म्हणजे झाले. कसे? (अशा तक्रारी करायची माझी शाळेतली सवय आता पुन्हा उपयोगात आणता येईल या विचाराने मी एकदम खूष झाले आहे असो)