लेखक/कवी/वाचकहो,
काही तांत्रिक अडचणींमुळे पी डी एफ फाईल मधून मजकूर घेणे जरा किचकट पडते आहे. यापुढे दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवणाऱ्यांना विनंती आहे की त्यांनी आपले साहित्य .txt फाइल च्या माध्यमातूनच पाठवावे. तसे करणे विशेष कठीणही नाही व संपादक मंडळालाही .txt फाईल मधील मजकूराशी व्यवहार करणे कमी वेळखाऊ आहे.
.txt फाईल बनवण्यासाठी टिपा:
१. बरहा मध्ये किंवा कोणत्याही मराठी युनिकोड टंकलेखन प्रणालीमध्ये तुमचा मजकूर टंकित करा. (उदा: ऑनलाईन: मनोगत,उपक्रम, गमभन इ.वर, ऑफलाईन गमभन, बरहा वर).
२. आता तुमच्या संगणकावर स्टार्ट मेनू मध्ये प्रोग्राम->अक्सेसरीज->नोटपॅड उघडा.
३. तुम्ही टंकीत केलेला मजकूर कॉपी करा आणि या नोटपॅड मध्ये चिकटवा.
४. ही फाईल सेव्ह करताना खाली 'एनकोडिंग फॉर्म्याट' ANSI असेल तो UTF-8 करा व फाईल सेव्ह करा. सेव्ह केल्यावर ही फाईल उघडून देवनागरी लिखाण सेव्ह केले होते तसेच दिसते का याची शाहानिशा करा.
५. अशा प्रकारे सेव्ह केलेल्या फाईलमध्ये देवनागरी मजकूर पेस्ट केला तर तो तसाच्या तसा उमटतो. तसेच या फाईल केव्हाही उघडून यांतला मजकूर कॉपी पेस्ट करुन थेट मनोगतासारख्या ठिकाणी जसाच्या तसा चिकटवता येतो.
६. उदाहरणादाखल हे चित्र पाहा:
७. .txt फाईल बनवण्यास अडचण आल्यास आम्हाला दिवाळीमनोगत या खात्यावर आपली अडचण सांगून व्य नि करा.