श्री. सुभाष,
आमच्याकडे भाज्या (त्यांत बारीक उभे चिरलेला कांदा सुद्धा) आणि काजू तेलात तळून बाजुला ठेवतात. नंतर पुलाव वाढताना त्यात मिसळून वाढायची प्रथा आहे.
यात भाज्या सुद्धा तळूनच घेता का? मी कधी असे ऐकल्याचे आठवत नाही. पुलावात काजू तळून टाकतात. पण तो ऐच्छिक प्रकार आहे. पुलाव वेगवेगळ्या पद्धतीने करतात. मोघलाई पद्धतीत 'व्हेज. पुलाव' हा प्रकारच नाही. मटणाचे तुकडे व इतर मसाले घालून भरपूर पाण्यात शिजवतात आणि ते पाणी गाळून घेऊन त्यात पुलाव करतात. त्यास 'आखणीचा पुलाव' असे म्हणतात. 'व्हेज. पुलाव' हे आपण बनविलेले रूप आहे. त्यामुळे त्याचे खास असे नियम नाहीत.
कित्येक वेळेला मसाल्याचे बरेच पदार्थ (थोडे प्रमाण वाढवून) एका पुरचुंडीमध्ये बांधून, ते पुलाव पहिल्यांदा शिजत असता त्यांत घालतात. नंतर जेव्हा पुलाव पसरून ठेवतात तेव्हा ती पुरचुंडी काढून टाकली की मसाल्याचा वास सर्वत्र लागून मसाल्याचे पदार्थ तोंडात येत नाहीत.
होय, अशा प्रकारेही गरम मसाला वापरता येतो. यासाठी मसाला जरा जास्त लागतो, हेही खरे आहे. तसेच, मसाल्याची पुरचुंडी करण्या आधी गरम मसाला भरडसर कुटून घ्यावा. त्याने वास छान लागतो.
कांही जणांना मात्र, घासा बरोबर काही मसाले, उदा. लवंग - काळी मिरी आख्खे खाण्यात जास्त मजा येते. 'व्हेज. पुलावाला' बारीक चिरलेल्या लसणाची फोडणीही करण्याची पद्धत आहे.
कुठल्याही पाककृतीत, पाककृतीच्या मुख्य प्रकृतीस धक्का न लावता, आपल्या आवडीनुसार, गरजेनुसार, पद्धतीनुसार बदल करण्यास कांहीच हरकत नाही.
अभिप्राया बद्दल मन:पूर्वक धन्यवाद.