हा खरेतर प्रतिशब्द म्हणता येणार नाही. वक्रनलिकेच्या संकल्पनेवर आधारित टेंटॅलस कप हे खेळणे आहे. त्याला मराठी विज्ञानाच्या पाठ्यपुस्तकात 'वसुदेव प्याला' असा पर्याय असे. टेंटॅलस कप समजून घ्यायला टेंटॅलसची गोष्ट (तो प्याला ओठाला लावताच रिकामा होत असे) समजून घेण्याची गरज असे. मराठीत तसे नव्हते. यमुनेचे पाणी चढत जाते पण बाळकृष्णाच्या पायाचा स्पर्श होताच ओसरते असे वसुदेव प्याल्याच्या उदाहरणात सांगितलेले असे.
मुळात वसुदेव प्याला असे खेळणे कोठे मिळत होते की नाही कळले नाही मात्र टेंटॅलस कपाला ज्याला वसुदेव प्याला हा पर्याय सुचला त्याला दाद द्यावीशी वाटते.