रोहिणी,

'ब्राऊन तांदूळ' या विषयावरील श्री. भाष यांचे 'भाष्य' सर्वसमावेशक आहे. मी त्यांच्याशी संपूर्णपणे सहमत आहे.
'पुलाव' हा मोघलाई पदार्थ आहे. आणि 'ब्राऊन तांदूळाचा' करण्याची पद्धत नाही. 'ब्राऊन तांदूळास' स्वत:ची 'खास' अशी एक चव (सुगंध नाही) असते. त्याचा भाज्यांच्या चवीशी मिलाप झाल्यास भाताच्या 'स्वत:च्या खास चवीस' उणेपणा येईल. दुसरे, कुठल्याही पदार्थात त्याच्या सुगंध, चवी इतकेच 'दिसणे'ही  महत्त्वाचे असते. पांढर्‍या शुभ्र, लांब दाण्याच्या तांदूळाचा पुलाव जितका 'देखणा' दिसतो तितका 'ब्राऊन तांदूळा'चा दिसणार नाही. असो.
तुम्ही मासे खात असाल तर माशाच्या कालवणाबरोबर 'ब्राऊन तांदूळाचा' भात, जेवणाची लज्जत कितीतरी वाढवतो. मासे खात नसाल तर आमटी भातही छान चवदार लागतो.
'ब्राऊन तांदूळ' जाडा असेल तर  कुकरमध्ये न शिजवता जास्त पाणी घालून पातेल्यात शिजवावा. भात शिजला की जास्तीचे पाणी गाळून घेऊन त्यात चवीनुसार मीठ, काळीमिरी पावडर आणि एक चमचा बटर (लोणी नाही) किंवा तुप टाकून ती पेज चहासारखी गरम-गरम प्यावी. 'लै झ्याक लागते.'

प्रतिसादा बद्दल धन्यवाद.