लेख आवडला. जवळपास सगळेच मुद्दे थोडक्यात पण नीट आले आहेत. 'बलुतं'पासून 'कोल्हाट्याच्या पोर'पर्यंत बघितले तर हेच दिसते की मराठी साहित्याला नव्या आणि वेगळ्या जाणिवा, अनुभव बहुजनांच्या, दलितांच्या साहित्यातून आल्या आहेत. शहरी लेखक कितीही थोर असले तरी ते ह्याबाबत ते अयशस्वी ठरलेले दिसतात. मराठी लेखक बरेचदा इंग्रजीत विचार करणाऱ्या (आमच्यासारख्या) मराठी वाचकांसाठी लिहीत आहेत की काय असे वाटते.
तसेच जेवढे भन्नाट आयुष्य तेवढेच भन्नाट लेखन होईलच असे नाही. हेमिंग्वेने जगलेले आयुष्य त्याच्या कथा-कादंबऱ्यांपेक्षा रंजक होते असे
अनेकांचे मत.
ला मांचाच्या डॉन कियोटी (Don Quixote)चा जनक सरवँटिसने अनेक लढायांत, मोहिमांत भाग घेतला होता. उमराववर्गाला त्याने जवळून बघितले होतो. ह्या उमराववर्गाच्या शौर्यविषयक कल्पनांची थट्टा करताना त्याला म्हणूनच कष्ट पडले नसावेत. पण अशा अनुभवांमुळे लेखनाला धार येते हे मात्र निश्चित.
तूर्तास एवढेच.
चित्तरंजन
किरण देसाईच्या इनहेरिटंस ऑफ़ लॉस ला बुकर पारितोषिक मिळाले होते. विनायकरावांनी वर 'रणांगण' आणि 'सत्तांतर'चा उल्लेख केलाच आहे. त्यात 'कोसला'चीही भर टाकता येईल. माझेही वाचन तुटपुंजे आहे. त्यामुळे चूभूद्याघ्या.