र-टा-ळ मालिका जास्तीत जास्त कंटाळवाण्या कश्या कराव्यात यासाठी झी मराठी पहा. सर्व मालिका एक से बढकर एक आहेत. आपल्यालाच मनस्ताप होतो. (त्या असंभव पेक्षा आहट का बघू नये!) अपवाद भटकंती, आम्ही सारे खवय्ये, होम स्वीट होम वगैरे. आतापर्यंत झी मराठी वरच्या मोजून दोनच मालिका मला आवडल्या. 'टिपरे' आणि प्रतिमा कुलकर्णींची 'प्रपंच'. आटोपशीर होत्या आणि वेळेत संपल्या. उगाच ताणल्या नाहीत. कोणी नवनिर्माता स्फूर्ती घेईल का त्यांच्यापासून?