चांगले साहित्य निर्माण करण्यासाठी खऱ्या अर्थाने होरपळून निघालेले जीवन
प्रत्यक्ष जगण्याची, किंवा जवळून बघण्याची आवश्यकता आहे का? माझ्या मते,
बहुतांशी होय
जीएंनी हातकणंगलेकरांना लिहिलेल्या एका पत्रात. "मराठी लेखक वेगळा अनुभव मिळत नाही असे म्हणतात पण. प्रत्येक अनुभव दगडासारखा बोडक्यावर येऊन आदळण्याची काहीच गरज नसते. केवळ असे वेगळे आयुष्य, असे वेगळे अनुभव असतात अशी जाणीव असली तरी ती पुरेशी असते. प्रत्येक गोष्टीचा अनुभव घेतल्याशिवाय त्याविषयी लिहिणे शक्य नसेल तर मग मृत्यू, प्रसूती असे विषय आपोआपच बाद ठरतात
"
आठवेल तसे लिहिले आहे. बरेच चुकले असण्याचा संभव आहे. पण आशय तोच.
चू.भू.दे̱.घे.