"..कुठल्यातरी नाटकाला गेलो असताना तिथं कुणाचातरी मोबाईल वाजल्यावर कडक शब्दांत आधी सांगूनही कोण हा मुर्खोत्तम मोबाईल चालु ठेवून माझं नाटक पहायला बसला आहे', अशा आविर्भावात पूज्य (इथं मला झिरो म्हणायचं आहे) विक्रम गोखलेंनी तिथल्या तिथे थांबवलेलं नाटक आणि त्यामुळे तिथल्या सहकलाकारांची उडालेली तारांबळ आठवली. त्यावर शेजारच्या सीटवरून आलेली "येड-टिंबटिंबटिंब..आहे थेरडा" अशी काहितरी शिवी आठवली आणि मनात गुदगुल्या झाल्या...."

मला तर त्यावेळी विक्रम गोखल्यांनी घेतलेली भुमिका पटली होती. भारतातच नाही तर अगदी अमेरीकेत सुद्धा महाराष्ट्र मंडळाच्या कार्यक्रमात मला हा अनुभव आला आहे. काही प्रसंगी मोबाईल बंद करायचं भानच लोकांना रहात नाही का त्यांना तेवढी अक्कल नसते हे काही कळत नाही.