योगेश,

माझा कॅव्हिट बघितलात? .."चांगले साहित्य निर्माण करण्यासाठी खऱ्या अर्थाने होरपळून निघालेले जीवन प्रत्यक्ष जगण्याची, किंवा जवळून बघण्याची आवश्यकता आहे का? माझ्या मते, बहुतांशी होय"

अपवाद म्हणजे, (माझ्या मते,) जी. ए., व्यंकटेश माडगूळकर, र.वा. दिघे, आनंद यादव, जयवंत दळवी, चित्तमपल्ली, अनिल अवचट अशी काही निवडक नावे. कारण ह्यांच्यात ''केवळ असे वेगळे आयुष्य, असे वेगळे अनुभव असतात अशी जाणीव असली तरी ती पुरेशी असते " हे होते, ती जाणीव होती, संवेदना तीव्र जाग्या होत्या/ आहेत. आणि परत, हे जे म्हटले आहे, ते जी. एंनी, हे ध्यानात घ्या. असली 'जाणीव' त्यांना उपजतच असावी, व मग त्यांच्या चौफेर वाचनातून ती तीक्ष्ण झाली असावी. त्यांनी हे असे सहज एका वाक्यात म्हणणे हे त्यांच्यापुरते शोभून दिसते, पण मला सांगा, अशी जाणीव आपणाला कितीशा इतर मराठी लेखकामधे दिसून आली?