श्री. भोमे (आणि इतर रसिक वाचकांस),

वाचकच एकमेकांना पाच किंवा दहा पैकी गुण देतील. आणि त्या प्रस्तुत लेखकाचे असे सगळे गुण गोळा होत राहून एक सरासरी "चारीत्र्य" (अर्थाचा अनर्थ करु नये) गुणमान तयार होईल. ते गुणमान त्या लेखकाचे अगदि सच्चे नसले, तरी एखाद्या उत्सुक वाचकाला ढोबळमानानी मार्गदर्शक ठरेल.

यात समस्या अशी निर्माण होऊ शकते की एखाद्या लेखकाचे/कवीचे सुरूवातीचे योगदान जरा निकृष्ट असले आणि बिचार्‍याला कमी 'गुण' मिळाले तर त्याचे 'सरासरी 'चारित्र्य' गुणमान' (गैर अर्थाने नाही) कमी राहून त्याला वाचक/रसिक मिळणेच दुरापास्त होऊन, त्याच्या  साहित्यकृतीचा दर्जा उंचावला तरी (वाचकच नसल्यामुळे) 'सरासरी 'चारित्र्य' गुणमानात' (गैर अर्थाने नाही) वृद्धी होणार नाही.

त्यामुळे लेखकाचे किंवा कवीचे 'सरासरी 'चारित्र्य' गुणमान' (गैर अर्थाने नाही) न ठरविता त्या विशिष्ट लेखाचे/कवितेचे गुणमान असावे. त्या वरून 'तो' लेख किंवा 'ती' कविता वाचायची की नाही हे चोखंदळ वाचकास ठरविता येईल.

वाचकांनी एकमेकांना गुण देण्यापेक्षा प्रशासकांनी ते देणं (कारण, चांगलं/वाईट सर्व साहित्य त्यांना वाचावेच लागते) जास्त सयुक्तीक ठरेल. पुन्हा, प्रशासक हेच प्रवर्तक असल्यामुळे त्यांचीहि कुचंबणा होऊ शकते. आईला सर्वच मुले सारखी. (पुरूष-मुक्ती संघटनांनी या वाक्याला कृपया आक्षेप घेऊ नये.)

धन्यवाद.