यापूर्वीचा प्रतिसाद टंकित करीत असताना, तुमचा प्रतिसाद आला नव्हता. त्यामुळे त्यासंबंधी लिहिणे राहून गेले.

त्या प्रतिसादात लिहिल्याप्रमाणे भारतीय किंवा मराठी साहित्यिकांना झोडपणे, जे जे काही चांगले आहे ते सारे परदेशी साहित्यातच आहे असे सांगणे हा लेखाचा हेतू नाही किंवा माझे व्यक्तिश: मतदेखील तसे नाही. एखाद्या वेगळ्या भाषेतले लेखन वाचत असताना, मनात तुलना होणे साहजिकच आहे. त्यातून तुम्ही म्हणता तसे, मध्यममार्ग काढणे अवघड आहे हे खरे. पण तसा प्रयत्न करायला काय हरकत आहे? 'वादे वादे जायते तत्त्वबोध:' सारखे या चर्चेतून, तोल न ढळता, काही नवीन माहिती मिळाली तर चांगलीच आहे. लेखातही शक्य तितका मध्यममार्ग चोखाळण्याचा प्रयत्न केला आहे. पण जर टोकाचे काही लेखन आढळले, तर तो दोष माझा. मात्र, मनोगतासारख्या संकेतस्थळावर टोकाला न जाता संतुलित चर्चा होईल असा विश्वास वाटतो म्हणून हा खटाटोप.