त्यामुळे मथितार्थ काढायचा तर पुरस्काराच्या मापाने साहित्य मोजू नये, प्रसिद्धीच्या,  टीका- कौतुकाच्या मापाने मोजू नये, अनुभवसमृद्धी, विशिष्ट जात (दलित वगैरे), विशिष्ट विचार (समाजवाद, कम्युनिझम), आजघडीचे फॅशनेबल विशिष्ट साहित्यप्रकार (गज़ला वगैरे) वगैरेंच्या मापाने  मोजू नये तर आपल्या स्वतःच्या मापाने मोजावे.

-- सहमत आहे. लेखातील शेवटच्या वाक्याने तोलामोलाचे साहित्य म्हणजे 'इन्हेरिटन्स ऑफ लॉस' इ. पुरस्कारप्राप्त पुस्तकांसारखे, असे ध्वनित होते - हे लेख परत एकदा वाचल्यावर लक्षात आले. तसे म्हणण्याचा उद्देश नव्हता.