द्वारकानाथजी,

ग्रंथ वाचून ज्ञानप्राप्ती होणार नाही हे मान्य. पण  ज्ञानप्राप्ती सत्पुरुषाच्या सहवासानेच होत असते हेही तितके खरे नाही.

माणसाच्याठायी जिज्ञासा असणे किंवा ती निर्माण करणे महत्त्वाचे आहे. माणसाच्या मनात ज्ञानाची अशीही शाखा आहे आणि ते ज्ञान आपल्याला व्हावे ही इच्छा निर्माण करणे हे ग्रंथवाचनाचे फलित असावे. असा जिज्ञासु साधकच ज्ञानाच्या लालसेने सत्पुरुषच्या सहवासाची अभिलाषा मनात धरतो. त्याने सांगितलेली साधना करण्यासाठीही ग्रंथवाचनच मार्गदर्शक ठरते असे मला वाटते. आपली साधना नक्की कोणत्या दिशेने व्हायला हवी यासाठी ग्रंथवाचनासारखे सहज साधन नाही. अगदी व्यवहारात देखील एखादी सुग्रण गृहिणी पाककलेचे पुस्तक वाचून स्वयंपाक जरी करत नसेल तरी नवीन पदार्थ शिकण्यासाठी ग्रंथांचा आधार नक्कीच घेते.

तेव्हा ग्रंथवाचनाबद्दल मनात अढी नसावी.