सत्पुरूष कसा ओळखावा? यापायी अनेक विद्वानांनी आयुष्य घालवले आहे. ज्यांना सत्पुरूष भेटल्याचे साक्षात्कार झाले ते भविष्यात तसे नसल्याचेही साक्षात्कार झाले आहेत. गुरूशिवाय एकलव्यही याच भूमीत निर्माण झाले आहेत आणि त्याच्यासारखेच केवळ मनातील प्रतिमेला गुरू मानून अनेक पुढे आले आहेत.

माणसाने त्याला शक्य होईल तितक्या प्रकारे अभ्यास सुरू ठेवणे महत्त्वाचे. ज्याला ज्ञानाची आसक्ती असते तो ते कोणत्याही प्रकारे मिळवू शकतो.