रविवार (जुलै १५) लोकसत्ताच्या लोकरंग पुरवणीमधला सत्त्वशीला सामंत ह्यांचा 'शब्दांच्या गमतीदार जन्मकथा'  हा लेख रोचक आहे.

'शब्दानंद' हा सत्त्वशीला सामंत ह्यांनी संकलित केलेला त्रैभाषिक शब्दकोश डायमंड प्रकाशनाने प्रकाशित केला आहे. ह्या शब्दकोशासाठी काम करत असताना त्यांना सापडलेली शब्दांच्या उत्पत्तीविषयक माहिती व गमती ह्याचे थोडक्यात वर्णन ह्या लेखामध्ये आहे.