नंदन
उत्तम लेख आणि प्रश्न. यात बरेच मुद्दे आहेत आणि त्यातले काही वर मांडले आहेत. माझ्या मते अपवाद वगळता चांगल्या दर्जाचे साहित्य कठीण अनुभवातून आले आहे असे दिसते. हा नियम सिद्ध करणारी बरीच उदाहरणे सापडतात. अनुभावालाबरोबरच दुसरी गोष्ट म्हणजे चौफेर वाचन. मराठी माणूस साधारणपणे आपल्या वर्तुळाबाहेरचे वाचायला नाखूष असतो. बऱ्याचदा नवीन विचार, कल्पना यांची खिल्ली उडवलेलीही दिसते. नवीन कल्पनांना मज्जाव केला तर लेखनात ताजेपणा येणे कठीण वाटते. जीएंच्या व्यासंगाबद्दल बरेच बोलले जाते ते याकरताच असावे. याचबरोबर खरी प्रतिभा असेल तर ती कुठल्याही परिस्थितीत स्वत:ला प्रगट करेल असे वाटते. सध्या डिकन्सचे डेव्हीड कॉपरफ़िल्ड वाचतो आहे. याचा प्रकाशनकाल साधारण १८५०. फ्रॉइडच्या आधी ५०-७५ वर्षे. तरीही डिकन्सच्या मानवी संबंधांच्या चित्रणामध्ये फ्रॉइडच्या अनेक मतांचे प्रतिबिंब दिसते.
सध्या मराठी अनुदिन्यांमधून बऱ्याचदा उत्तम साहित्य वाचायला मिळते. दुसरे म्हणजे मराठी लोक अमेरिकेत असोत किंवा भारतात, त्यांना मराठी वाचायला, लिहायला आवडते आहे. मला वाटते ही नक्कीच आशावादी गोष्ट आहे.
जागतिकीकरणाच्या मुद्द्यावर चीन, जपान यासारख्या देशांमध्ये साहित्याची सध्याची परिस्थिती काय आहे हे जाणून घेणे मनोरंजक ठरावे. शेवटी, हा मुद्दा इतर भारतीय कलांबाबतही लागू होउ शकेल. दुसऱ्या शब्दात, असा दिवस कधी येइल (येईल का?) की कपोला रामगोपाल वर्माच्या चित्रपटावरून स्फूर्ती घेईल?
हॅम्लेट