प्रेक्षकांना जर स्व:ताला मायबाप म्हणवून घ्यायचं असेल तर त्यांनी सुद्धा नटाच्या एकाग्रतेचा मान राखायला हवा. तुम्ही पैसे देवून जरी आला असलात तरी समोरचा माणूस तुमच्यासाठी स्टेजवर घाम गाळतो आहे याचं भान असलच पाहिजे. स्टेजवरच्या पात्रांना काम करण्याची उर्जा प्रेक्षकांकडून मिळत असते. प्रेक्षक कधीही पॅसिव्ह असून चालत नाही. जाणकार नटांना प्रेक्षकांची ऍक्टिव्ह इन्व्हॉल्व्हमेंट लगेच लक्षात येते.

...पण हा फारच वरच्या पातळीचा विचार झाला. मोबाईल कटाक्षाने बंद किंवा सायलेंट ठेवावा ही अपेक्षा आमच्याकडून ठेवूच नये कारण आम्ही चुकणारच..खरच विक्रम गोखले उर्मट आहेत.

आश्चर्य आहे..असा अनुभव इथे असताना कधी ऑपेरा किंवा कॉन्सर्ट मधे नाही आला..