प्रिय भटका यांस,
प्रेक्षक स्वतःला मायबाप म्हणवून घेऊ इच्छितात असं मी कुठंच म्हटलं नाहीये. उलट विक्रम गोखलेच प्रेक्षकांना 'मायबाप' संबोधतात. आणि हो, सुचना ऐकूनही कोणी मुद्दाम मोबाईल चालू ठेवत असेल असे मला तरी वाटत नाही.
इथल्या (परदेशातल्या) प्रत्येक गोष्टीची (चांगल्या/वाईट) भारतातील वस्तुस्थितीशी सगळेच जण तुलना करत असतात. इथे (परदेशात) सगळं 'किती छान' म्हणायचं आणि तेच आपल्या देशात 'किती घाण' असं म्हणुन नाक मुरडायचं, हे काम इथं(परदेशात) आलेले बरेच जण अगदी चोखपणे करत असतात. त्यात नवीन काय?
क्षणभर डोळे मिटा. तुम्ही परदेशात यायच्या अगोदर एखादं नाटक बघितलं असेल ते आठवा. (१)कल्पना करा - नाटक एका महत्त्वाच्या वळणावर आलंय. आणि मोबाईलची रिंग वाजली आणि बंदही झाली. (२) आता पुन्हा कल्पना करा - नाटक एका महत्त्वपूर्ण वळणावर आलंय आणि तुमच्या कानावर झुरळ बसलंय असं वाटलं म्हणून तुम्ही डोकं जरा इकडं तिकडं हलवलंत आणि हातानं कान झटकलेत आणि पुन्हा नाटक बघायला सुरुवात केलीत.(३) आता शेवटची एकच कल्पना करा -नाटकाचा क्लायमॅक्स सुरु झालाय आणि तुमच्या कानावर झुरळ बसलं(किंवा मोबाईलची एक रिंग झाली) ते विक्रम गोखलेंना कळलं त्यामुळं त्यांनी नाटक मध्येच जवळजवळ १० मिनिटं थांबवलं. बाकीचे कलाकारही गोंधळले(ओशाळले).
(१) आणि (२) मध्ये काही वा सर्व प्रेक्षक आणि/वा कलाकार(कमी जास्त प्रमाणात) क्षणएकभरासाठी डिस्टर्ब होतील. पण (३) मध्ये सगळेच प्रेक्षक/सहकलाकार १० मिनिटं (किंबहुना त्यापेक्षाही जास्त) डिस्टर्ब होतील. सगळ्यांची लागलेली लिंक तुटेल ते वेगळंच. असो.
नाटकाच्या सुरुवातीला मोबाईल बंद/म्यूट ठेवण्याची विनंती करून प्रेक्षकांच्या सदसद्विवेकबुद्धीला आवाहन करणे, इथंपर्यंतच योग्य वाटते. अतिपरिचयात अवज्ञा.
चर्चेचा विषय झी टिव्हीवरील सिरियल्सविषयी आहे आणि तुमच्या प्रतिसादातून थोडंसं विषयांतरही होतंय, असं वाटतंय. माझ्यावतीने वादावर इथेच पडदा टाकतो.
धन्यवाद.
कृपया आपण वाद व्यक्तीशः (पर्सनली) घेऊ नये, ही विनंती.