महाराष्ट्रातील वर्ध्याजवळ सेवाग्रामचे महत्व काही आगळे वेगळेच आहे. सेवाग्राम येथे खालील प्रेक्षणीय स्थळे आहेत.

  1. महात्मा गांधींनी सेवाग्राम येथे दांडीयात्रेनंतर आपला मुक्काम जवळपास १० वर्ष होता.(१९३२ ते १९४२). देशाच्या मध्यभागी असलेले भौगोलिक स्थान, त्यामुळे देशातील सर्वच कार्यकर्त्यांना भेटणे सोईचे होईल हा त्यामागील उद्द्येश होता. तेथे त्यांचा रम्य असा आश्रम आहे. बापुची कुटी, बा की कुटी, त्यांचे सचिव महादेवभाई यांची कूटी, आश्रमातील रुग्णासाठी असलेली जागा, इतरत्र असलेली प्रशस्त जागा, मोठाले वृक्ष आणि रम्य असा परीसर एकदा तरी पहावा असाच आहे.
  2. जवळच पवनार येथे विनोबांनी स्थापन केलेला ब्रह्मविद्या आश्रम आहे. तेथील वैशिष्ठ्य म्हणजे हा आश्रम पुर्णपणे स्त्रीयाच चालवतात. स्त्रीयांच्या उन्नतीसाठी त्यांनी ब्रह्मविद्याचा अभ्यास करावा असे विनोबाजींचे मत होते. तेथे राहण्याचीसुध्दा सोय आहे. विनोबा आणि गांधीविचाराचे सर्व साहित्य येथे मिळते.
  3. गांधींनी आपले पाचवे मानलेले पुत्र श्री. जमनादासजी बजाज यांचे वस्तुसंग्रहालय. हे संग्रहालय पाहतांना आपले स्वातंत्र्य चळवळीशी आपले नाते वेगळ्याच स्तरावर नेवुन प्रस्थापित करते.
  4. मगन वाडी येथे काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्यांचे निवासस्थान आहे. तेथे सरहद्द गांधी वगैरे नेते मुक्काम करीत असत. तेथे जुनी फोर्ड गाडी ठेवलेली आहे. तिला बैलानी जोडून त्यावेळच्या नेत्यांना आणण्या नेण्यासाठी वापर करत. सरदार पटेल तिला थट्टेने ऑक्स-फोर्ड असे म्हणत.
  5. गीताई मंदिर. विनोबाजींची गीताई मोठ्या शिलाखंडावर कोरलेली आढळते. त्याची रचनाही पाहण्यासारखी आहे. आकाशातुन पाहिले तर त्या शिलाखंडाचा आकार चरख्याप्रमाणे अथवा बसलेल्या गाई प्रमाणे आढळतो.
  6. जवळच बुध्दाची एक मोठी आणि बसलेल्या अवस्थेतील मुर्तीही दिसते. तेथे अनेक परकिय पर्यटक भेट देत असतात.

एका दिवसाची सेवाग्राम भेट एक आगळे वेगळे समाधान देत असते.

द्वारकानाथ