मूळ गीताचे बोल ऐकल्यानंतर भाषांतर वाचले. शब्दश: अनुवाद केलेला नाही, तर भावानुवाद केला आहे, ही गोष्ट विशेष आवडली. पहिल्या तीन कडव्यांमध्ये साधलेली लय शेवटच्या कडव्याच्या पहिल्या ओळीत 'जगही छळेल...' या ठिकाणी धोडी भंग पावल्याने चालीत म्हणताना अडखळायला झाले. त्या ज़ागी लयबाधा टाळण्यासाठी पर्यायी शब्दयोजना करता येईल का, याचा विचार करतो आहे.