कल्पना आणि ओळींमधली सहज़ता विशेष आवडली. पहिला शेर आणि अंकुर विशेष आवडले. पहिल्या शेरात 'घाव झाला'च्या ऐवजी 'घाव माझा' केल्यास अर्थगर्भाच्या दृष्टीने अधिक स्पष्ट आणि परिणामकारक होईल, असे मला वाटते ('बोलताना माझा तोल गेल्याने मी केलेला घाव अधिकच खोल गेला' अशा अर्थाने). तांत्रिकदृष्ट्या अचूक असले, तरी 'खोल' या काफ़ियाची 'वार होणे/करणे' आणि तो 'खोल ज़ाणे/होणे' या अर्थाच्या दृष्टीने झालेली पुनरावृत्ती आणि 'रोल' या बिगर मराठी काफ़ियाचे उपयोजन या गोष्टी ठळकपणे खटकल्या.
पुढील लेखनासाठी अनेक शुभेच्छा.