४) नाटक एका महत्त्वपूर्ण वळणावर आलंय, एक मोबाईल वाजला. गोखल्यांची अभिनयाची एकाग्रता ढळली. तरीही त्यांनी दुर्लक्ष केले. मोबाईल बंद झाला. परत १० मिनीटांनी मोबाईल वाजला. आता आधी मोबाइल बंद करणारा बोलू लागला, 'हॅलो, हॅलो, काय? जरा मोठ्याने बोल. इथे रेंज नाहीये. नाटकाला आलो आहे रे/गं.अं? ते रे, अमुक तमुक नाटक.. तू बोल.ओके ओके,तुला नाटक संपल्यावर रिंग देतो. बाय.' आणि आजूबाजूचे प्रेक्षक तो काय बोलतोय ते कान देऊन ऐकू लागले.
सारांश: एकाला एक मोबाईलची रिंग माफ केली तर पुढच्यावेळी अशा १० अतिमहत्वाच्या माणसांच्या १० रिंग वाजतील. त्यापेक्षा त्यांनी एकदा थांबून स्टंट केला तर निदान पुढच्या वेळी माणसं आपल्या मित्रांना सांगतील तरी, 'अरे मोबाइल सायलेंट वर न चुकता ठेव हां, रिंग वाजली की ते नाटक बंद करतात.'
इतर लोकांना ते 'येडxx म्हातारा' वाटले तरी त्यांच्या थांबण्यामागेही विचार असू शकतो.
आपणा सर्वांना मोबाईलचे आणि गॅजेटस चे व्यसन आहे. १५ मिनीटॅ रेंज आली नाही किंवा संगणक/आंतरजाल बंद असला की आपोआप माणूस बेचैन होऊ लागतो.