निनाद,

माझ्या लाडक्या लंपनवर कोणीतरी लिहीलंय, हे वाचून खूप आनंद झाला.  प्र. ना. संतांची सगळ्याच पुस्तकांची मी पारायणे केली आहेत.  लंपन, त्याचे आजी-आजोबा, बाबूराव, सुमी आणि इतर मित्रमंडळी हे सगळं अप्रतिमच! संतांच्या अकाली निधनाने आपण लंपनला दुरावलो. 'मनोगत' वर फारसं कुणी काही यावर लिहिलेल माझ्या तरी वाचनात आलेलं नाही.  तुमच्या लेखनामुळे लंपनची पुन्हा खूप आठवण आली! आता पुन्हा एकदा, वनवास, शारदासंगीत वगैरे कपाटातून बाहेर काढते!

लंपनप्रेमी

स्वाती